Monday 18 September 2017

फुलोरा 
मोराचा खुप सुंदर अन डौलदार 
फुलोरा बघितलाय
पण त्यामागची त्याची मेहनत आणि जिद्द 
पहिलित का कधी  

एवढ सोप नसत मोर होण
स्वतःच्या शरीरापेक्षा कितीतरी पट वजन 
आणि त्याही पेक्ष्या मोठा तो फुलोरा 
 अन त्याला फक्त उचलायचाच नसत बर
तर त्याला फुलवत असता 
डौलदार पावले टाकून नाचयाचही असत
तीच तर त्याची खासियत असते
अणि ती जपण्यासाठी त्याला किती कष्ट पडत असतील 
खरच एवढे सोपे असते का मोराचे आयुष्य 
का आपल्यालाच वरवरचे पहायची सवय झलिये 

No comments:

Post a Comment